
आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव….!
कोणता टप्पा भारी अन् कोणता अवघड हा प्रश्न मात्र मनाला हळवा करतो .
आईच्या कुशीत सुरू झालेला हा प्रवास ,10वी पर्यंत अत्यंत सुखकर झाला.
त्यानंतर मात्र आयुष्य जरा अवघड वाटू लागलं. किती ते tension किती तो मनस्ताप आणि काय ती जबाबदारी …त्यामुळे Career वर थांबलेला हा टप्पा कठीण वाटू लागला.
किती खटाटोप या छोट्याश्या आयुष्यासाठी आणि स्वतःवर ओढावलेल्या या परिस्थितीसाठी…
धकाधकीच्या या जीवनात स्वतःसाठी जगायला मात्र कधी भेटलचं नाही. आणि नंतर जेव्हा स्वतःला वेळ भेटला तेव्हा मात्र समजले आयुष्य जगायचं तर राहूनच गेलं.
-WriterGirlGayu,
#Missengineer